Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोलापूर - भाजप-काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरला नाही; उमेदवारीसाठी शेवटचे दोन दिवस

सोलापूर - भाजप-काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरला नाही; उमेदवारीसाठी शेवटचे दोन दिवस

सोलापूर, 30 मे (हिं.स.)। सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेकडून रमेश बारसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आतापर्यंत दाखल झालेला हा एकमेव अर्ज असून विविध पक्षांच्या इच्छुकांनी अर्ज उचलल्याने निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.मनसेचे दिलीप धोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे वसंतराव देशमुख, एमआयएमच्या वाहिदा शेख तसेच भाजपचे भीमा आसादे यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मात्र भाजप आणि काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार, 1 जून हे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून केवळ रमेश बारसकर यांचाच अर्ज दाखल झाला आहे.

निवडणुकीसाठी 25 मे ते 1 जून या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. प्राप्त अर्जांची छाननी 2 जून रोजी होणार असून, 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे.या निवडणुकीत मतदारांकडून बॅलेट पेपरवर पसंतीक्रमानुसार मतदान घेतले जाणार आहे. 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 22 जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे.सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात जिल्हा परिषदेचे 68, महानगरपालिकेचे 111 आणि नगर परिषदांचे 426 असे एकूण 616 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi