Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोलापूर महापालिकेच्या विषय समित्यांची धुरा नव्या सभापतींकडे

सोलापूर महापालिकेच्या विषय समित्यांची धुरा नव्या सभापतींकडे

सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी गुरुवारी झालेल्या निवड प्रक्रियेत सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या सभापतींवर महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निर्मला जंगम, स्थापत्य समितीच्या सभापतीपदी विजय चिप्पा, आरोग्य समितीच्या सभापतीपदी सुनील खटके, कामगार व कल्याण समितीच्या सभापतीपदी श्रद्धा किरण पवार, विधी समितीच्या सभापतीपदी सत्यजित वाघमोडे, मंडई व उद्यान समितीच्या सभापतीपदी मल्लिकार्जुन पाटील, तर शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदी स्वाती बडगु यांची बिनविरोध निवड झाली.

निवडीनंतर महापालिका परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सहकारी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांचा सत्कार केला.

यावेळी नवनिर्वाचित सभापतींनी शहराच्या विकासकामांना गती देणे, नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच समित्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला.

महापालिकेतील विविध विषय समित्यांना नवे नेतृत्व मिळाल्यामुळे प्रशासन आणि विकासकामांमध्ये अधिक समन्वय व गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi