Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

सोलापूर : महात्मा फुले जीवनदायी योजनेत नोंदणी आवश्यक

सोलापूर 6 मार्च (हिं.स) : महात्मा फुले जीवनदायी योजनेखाली नोंदणीकृत असलेल्या खासगी रुग्णालयातून कोरोनावरील लस देण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राज्यातील ७०० हॉस्पिटलमधून तर सोलापूर जिल्ह्यातून ११ हॉस्पिटलमधून कोरोनावरील लस दिली जात आहे. येत्या आठवड्याभरात हाॅस्पिटलची संख्या आणखी वाढणार आहे. सध्या खासगी हाॅस्पिटलमधून २५० रुपयांना एक लस मिळणार आहे. यात १५० रुपये शासन तर १०० रुपये हॉस्पिटल चालकांना असा वाटा असेल. एका व्यक्तीला दोन लस घ्याव्या लागणार आहेत, अशी माहिती योजनेचे समन्वयक डॉ. दीपक वाघमारे यांनी दिली.

जिल्ह्यात लसीकरणास सुरुवात झाली आहे. दोन टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचारी यांना लस देण्यात येत असून, त्यातील एकूण ४० हजारांहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

१ मार्चपासून कोमॉर्बिड व ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. हा आकडा सात लाखांपर्यंत असल्यामुळे शासकीय रुग्णालयात देणे शक्य नसल्याने महात्मा फुले योजनेशी संलग्न असलेल्या हॉस्पिटलमधून देण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे जिल्ह्यातील ४० हून हॉस्पिटलमधून ही लस दिली जाईल.

हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi