Saturday, 08 Aug, 7.23 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
सोलापूर : यूपीएससी यशस्वीतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सोलापूर 8 ऑगस्ट (हिं.स) : यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण सोलापूर जिल्ह्यातील सहा यशस्वीत्यांचा सत्कार आज रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्या प्रमुख अायोजनात पार पडला.

सोलापूर जिल्ह्यातील 11 उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी शशांक माने, राहुल चव्हाण , भैसारे शुभम , अजिंक्य विद्यागर , अश्विनी वाकडे , अविनाश जाधवर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार त्यांच्या पूर्ण कुटुंबीयांसमवेत करण्यात आला. हिंदुस्थान समाचार

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top