Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रातून 'राष्ट्र प्रथम'चा संदेश : हभप बालासाहेब महाराज नेब

परभणी, 30 मे (हिं.स.)।

देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणार्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रातून 'राष्ट्र प्रथम' हाच संदेश मिळतो, असे प्रतिपादन हभप बालासाहेब महाराज नेब यांनी केले.

येथील श्री योगानंद महाराज स्थापित दत्त मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अॅड. अनिरुद्ध पांडे, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्याम झाडगावकर, भागवत कथा सप्ताहाचे यजमान दीपक गाजरे, कार्याध्यक्ष संजय जोशी भोगावकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना हभप बालासाहेब महाराज नेब यांनी सांगितले की, ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. त्यांनी देशातील युवकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi