Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टेक्सासमध्ये हनुमान मूर्तीवरून वाद; भारतीय-अमेरिकन समुदायाकडून तीव्र विरोध

टेक्सासमध्ये हनुमान मूर्तीवरून वाद; भारतीय-अमेरिकन समुदायाकडून तीव्र विरोध

वी दिल्ली , 22 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय-अमेरिकन समुदाय राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेषतः हिंदू धर्म आणि त्यांच्या श्रद्धेविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा मुद्दा चर्चेत आहे.

टेक्सासमध्ये भगवान हनुमानांची ९० फूट उंच मूर्ती हटवण्याची भाषा एका पुराणमतवादी यूट्यूबरने केल्यानंतर हा वाद आणखी चिघळला असून, त्याच्यावर तीव्र टीका होत आहे.

टेक्सासमधील शुगर लँड येथील अष्टलक्ष्मी मंदिरात ही मूर्ती स्थापित करण्यात आली असून, तिचे नाव 'स्टॅच्यू ऑफ युनियन' आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून ही मूर्ती वादाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही समर्थकांनी या मूर्तीला गैर-ख्रिश्चन ठरवले होते.मात्र, या चर्चेला वांशिक भेदभावाचा रंग तेव्हा मिळाला, जेव्हा यूट्यूबर आणि 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' कार्यकर्ता जेसी ह्यूजेस यांनी 'एक्स'वर या मूर्तीचा फोटो शेअर केला. त्यासोबत त्यांनी लिहिले की, "जेव्हा आम्ही जिंकू, तेव्हा ही मूर्ती पाडून टाकू."

ह्यूजेस यांच्या या पोस्टनंतर हिंदू संघटना आणि विचारवंतांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अमेरिकन लष्कराचे माजी सैनिक रुचिर बक्षी यांनी त्यांच्या या वक्तव्याला देशद्रोही आणि हिंदू धर्मासाठी धोका असल्याचे म्हटले. स्वतःला अमेरिकन-हिंदू म्हणून संबोधताना बक्षी यांनी अमेरिकेत हिंदूंविरोधात वाढत असलेल्या द्वेषाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, अमेरिकेतील अन्य कोणत्याही समुदायाच्या प्रार्थनास्थळाची केवळ त्यांच्या श्रद्धेचा द्वेष करता म्हणून तोडफोड करणे, हा थेट हिंदू धर्मासाठी धोका आहे.ते पुढे म्हणाले की, अमेरिकेत जिंकण्याचा अर्थ हिंदू मंदिरे पाडणे असा असेल, तर ज्या देशासाठी मी लढलो तो देश तुम्हाला नको आहे. तुमच्यासारखे नसलेल्या लोकांना लक्ष्य करण्याचा परवाना तुम्हाला हवा आहे.

बक्षी यांच्या या वक्तव्याला 'कोऍलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका' आणि टेक्सासमधील अमेरिकन लष्कराचे आणखी एक माजी सैनिक तसेच राजकीय विश्लेषक कार्ल व्हेलेस यांनीही पाठिंबा दिला.'कोऍलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका'ने 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले की, "या प्लॅटफॉर्मवर उघडपणे होत असलेली धार्मिक कट्टरता पाहून आम्हीही तुमच्याइतकेच हैराण आहोत. त्याविरोधात तुमच्यासोबत लढताना आम्हाला अभिमान वाटतो."

टेक्सास हे अनेक दशकांपासून रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिले आहे. १९९४ पासून या राज्यात कोणत्याही प्रमुख पदावर डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही. या राज्यात पाच लाखांहून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिक राहतात.टेक्सासमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. राज्यपालपद, सर्व प्रमुख कार्यकारी पदे तसेच राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांवर या पुराणमतवादी पक्षाचे नियंत्रण आहे.

टेक्सासमधील निवडणूक प्रचारादरम्यान स्थलांतरितांविरोधातील वक्तव्ये हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा व्हाइट हाऊसमध्ये परतल्यानंतर अशा वक्तव्यांमध्ये आणखी वाढ झाल्याचे सांगितले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi