Dailyhunt
उच्च न्यायालयाची गोकुळच्या संचालक मंडळाला मुदतवाढ नाही, प्रशासक नियुक्ती अटळ

उच्च न्यायालयाची गोकुळच्या संचालक मंडळाला मुदतवाढ नाही, प्रशासक नियुक्ती अटळ

कोल्हापूर, 30 एप्रिल (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अवसायानातील 1100 हून अधिक संस्थाच्या पात्रातेचा मुद्दा प्रलंबित असून त्याच्या सहकार निबंधक दुग्ध यांचेकडे सुनावण्या सुरु आहेत.

त्यामुळे संचालक मंडळाची मुदत संपत आली तरी निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गोकुळ दुध संघावर प्रशासकराज अटळ आहे.

सभासद संस्था आणि अवसायानामधील संस्थांच्या सुनावणीमुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची गोकुळकडून न्यायालयाला विनंती करण्यात आली होती.

आज (30 एप्रिल) विद्यमान संचालक मंडळाला झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गोकुळवर प्रशासकराज अटळ आहे. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपत आहे. त्यामुळे आता संचालक मंडळाला मुदतवाढ न मिळाल्याने गोकुळवर प्रशासकराज जवळपास निश्चित झालं आहे. प्रशासक नियुक्तीमुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान चार महिन्याने पुढे जाण्याची शक्यता आहे. सभासद संस्था आणि अवसायानामधील संस्थांच्या सुनावणीमुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची गोकुळकडून न्यायालयाला विनंती करण्यात आली होती. दरम्यान, गोकुळ दूध संघाने न्यायालयाची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi