Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उखाड्याने हैरान नाशिककरांना पावसाचा दिलासा

उखाड्याने हैरान नाशिककरांना पावसाचा दिलासा

नाशिक, 02 जून (हिं.स.)। मोठ्या प्रमाणावर उकाडा सहन करणाऱ्या नाशिककरांना मंगळवारी दुपारी झालेल्या पावसाने काहीसा दिला आहे. दरम्यान या पावसामुळे नाशिककरांची अवस्था अधिकच गंभीर झाली असून शहरांमध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झालेले आहे.

जून महिन्याला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच नाशिक मध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यावर्षी पाऊसही काहीसा उशिरा सुरू होत आहे. पावसापूर्वीच नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे अर्धा तास शहर आणि परिसरामध्ये पाऊस पडला तर जिल्ह्यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर चा काही भाग, घोटी,मालेगाव बागलान सटाणा या भागातही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागामध्ये झालेल्या पावसामुळे मशागतपूर्व जी शेतीची तयारी शेतकऱ्यांनी केली होती त्याला या पावसाने थोडीशी मदत झाली आहे. तर मालेगावच्या काही भागांमध्ये गारपीट झाल्याचे देखील येथील नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

दरम्यान नाशिक शहरामध्ये बहुतांशी भागात विजेच्या कडकडासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली जवळपास शहर आणि परिसरामध्ये अर्धा तास सतत झालेल्या पावसामुळे संपूर्ण शहर हे पावसाने नाहून निघाले. मागील काही दिवसापासून नाशिक शहरवासी यांना 42 अंश आणि त्या जवळपास असलेल्या तापमानाचा सामना सातत्याने करावा लागत होता पण मंगळवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान शहर आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांच्या मुळे संपूर्ण शहरात चिखलाचे साम्राज्य झाले होते. अनेक भागांमध्ये कुंभमेळ्याची काम सुरू आहे. परंतु ठेकेदारांकडून योग्य ती काळजी न घेतल्या गेल्यामुळे या भागामध्ये चिखलाचे साम्राज्य झाले होते. अनेक भागात चिखल झाल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे देखील मुश्किल झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi