Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उपमहानिरीक्षक शहाजी उमाप गुरुवारी लातूर दौऱ्यावर

उपमहानिरीक्षक शहाजी उमाप गुरुवारी लातूर दौऱ्यावर

लातूर, 06 मे (हिं.स.) : लातूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप हे गुरुवार, 7 मे 2026 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान ते नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या अडचणी मांडण्याची एक महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आढावा बैठकीनंतर दुपारी 2 ते 3 या वेळेत शहाजी उमाप हे लातूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहतील. या वेळेत नागरिकांना वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या पोलीस प्रशासनाशी संबंधित तक्रारी थेट मांडता येणार आहेत.

ज्या नागरिकांना आपल्या समस्या मांडायच्या आहेत किंवा तक्रारींचे निवारण करून घ्यायचे आहे, त्यांनी दिलेल्या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः नागरिकांच्या समस्या ऐकणार असल्याने, या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi