Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वर्धेत नगवळाऊ गायीच्या शेणापासून तयार होणार इको-फ्रेंडली गणपती

वर्धेत नगवळाऊ गायीच्या शेणापासून तयार होणार इको-फ्रेंडली गणपती

वर्धा 27 ऑगस्ट (हिं.स.)

शाडूच्या मातीपासून तयार केलेली गणेश मूर्ती की प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती, यात सोयीचे काय हा एक मुद्दा व पर्यावरण सुरक्षा हा दुसरा मुद्दा. हा खल चालूच आहे.

पीओपी मूर्त्या या पाण्यात विघटनशिल नाहीत, म्हणुन त्यावर बंदीचा आग्रह पण तरीही त्याची विक्री सुरूच असल्याचे लपून नाही. मात्र या वादावर मत करणारा एक उपाय आता पुढे आला आहे. त्यात श्रद्धा आहेच आणि पावित्र्य पण. महिलांनी गणेश भक्त मंडळीसाठी हा पर्याय दिला आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हेटीकुंडी येथे एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 'गवळाऊ शासकीय पशु पैदास क्षेत्र, हेटीकुंडी' आणि 'गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत गट, हेटीकुंडी' यांच्या संयुक्त विद्यमाने गवळाऊ गायीच्या गोमयापासून (शेणापासून) आकर्षक व इको-फ्रेंडली गणेशमूर्तीची निर्मिती करण्यात येत आहे. विदर्भाची ओळख वर्धेची माय, विदर्भाचे भूषण गवळाऊ गाय ही संकल्पना इकडे चांगलीच परिचित आहे. त्याच संकल्पनेला अधोरेखित करत हा उपक्रम राबवला जात आहे.पवित्र गोमय व नैसर्गिक रंगः या सर्व मूर्ती शुद्ध गवळाऊ गायीच्या शेणापासून बनवण्यात आल्या असून त्यांना सजवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे.देशी गवळाऊ गायींच्या संवर्धनाला आणि स्थानिक महिला रोजगाराला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.

तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष (उमेद), कारंजा (घाडगे) आणि जिल्हा वर्धा यांच्या सहाय्याने हा उपक्रम चालवला जात आहे. गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत गट, शासकीय पशु पैदास क्षेत्र, हेटीकुंडी ता. कारंजा-घाडगे, जि. वर्धा यांच्यामार्फत नागरिकांना यावर्षी इको-फ्रेंडली गणेशमूर्तीची स्थापना करून पर्यावरण संवर्धनात हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi