Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
व्हेंटिलेटर कंपन्या सरकारला व्हेंटिलेटर आणत आहे - खा. अरविंद सावंत

व्हेंटिलेटर कंपन्या सरकारला व्हेंटिलेटर आणत आहे - खा. अरविंद सावंत

मरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर खासदार अरविंद सावंत यांची पाहणी

अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.)। व्हेंटिलेटर कंपन्या सरकारला व्हेंटिलेटरवर आणत आहे. फायर ऑडिट वरून एकमेकांवर बोट दाखवत आहे.

आम्हाला दोन मंत्र्यांचे भांडण पाहायचे नाही.मुख्यमंत्री यांनी या दोन्ही मंत्र्यांचे कान टोचावे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बाळांच्या अतिदक्षता कक्षाला सोमवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बाळांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. खासदार अरविंद सावंत यांनी रुग्णालयातील नवजात बाळांच्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर खासदार सावंत यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विनोद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. रुग्णालयातील नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागाची व्यवस्था, सुरक्षेच्या उपाययोजना आणि आगीच्या घटनेनंतरची परिस्थिती याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi