Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

यवतमाळ : आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकांसह पाच जणांवर गुन्हा

वतमाळ, 30 ऑगस्ट (हिं.स.)। जोपूळ (ता. दिंडोरी) येथील शासकीय मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक हरिदास शेखरे आश्रमशाळेच्या दहावीतील वसतिगृहात हरिदास अंबादास शेखरे (वय १६, रा. दळवट, ता.

सुरगाणा) या विद्याथ्यनि आत्महत्या केल्याप्रकरणी संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापिकेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरुवातीला प्रेमप्रकरणातून विद्याथ्यनि टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा असताना, मृताच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर आश्रमशाळेचे संस्थाचालक, वर्गशिक्षक यांच्यासह पाच कार्यवारयाविरुद्ध विद्यार्थ्यांचा मानसिक प्रवृत्त केल्याचा गुन्हा संस्थाचालक जयराम उगले ऊर्फ पाटील, वर्गशिक्षिका रौंदळे, मुख्याध्यापिका संध्या साखरे, अधीक्षक माळी आणि लिपिक भदाणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आला. हरिदासने गुरुवारी (ता. २७) सकाळी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेत आत्महत्या केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi