हिरे-सोन्याच्या दागिन्यांसह ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सचा नजराणा
घनश्याम ढोलकिया यांच्या हस्ते १२ व्या एक्सक्लुझिव्ह शोरूमचे उद्घाटन
यवतमाळ, 24 ऑक्टोबर (हिं.स.) यवतमाळच्या दागिन्यांच्या बाजारपेठेत आता 'किसना'च्या रूपाने हिऱ्यांची नवी चमक अनुभवायला मिळणार आहे.
हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीने यवतमाळातील केदारेश्वर महादेव मंदिर रोड येथे आपल्या बाराव्या एक्सक्लुझिव्ह शोरूमचे भव्य उद्घाटन केले. हरि कृष्णा ग्रुपचे संस्थापक घनश्याम ढोलकिया यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या दालनामुळे यवतमाळच्या ग्राहकांना आधुनिक डिझाइन्समधील हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
घडणावळीच्या शुल्कावर १०० टक्क्यांपर्यंत सूट; ग्राहकांसाठी ऑफर्सची पर्वणी!
शोरूमच्या शुभारंभाचे औचित्य साधून कंपनीने ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. डायमंड आणि गोल्ड ज्वेलरीवरील घडणावळीच्या शुल्कावर १०० टक्क्यांपर्यंत सूट, केवळ २५ टक्के डाउन पेमेंटवर 'डबल गोल्ड रेट प्रोटेक्शन' आणि जुने सोने एक्सचेंज केल्यास डायमंड ज्वेलरीसाठी त्याच्या मूल्याच्या १०५ टक्के रकमेची ऑफर ग्राहकांना मिळू शकते.
याशिवाय, डायमंड ज्वेलरीवर घडणावळीच्या शुल्कासह ९० टक्के बायबॅक आणि ९५ टक्के एक्सचेंजची सुविधा देण्यात आली आहे. 'ग्रँड लकी ड्रॉ'च्या माध्यमातून कार आणि स्कूटर जिंकण्याची संधीही ग्राहकांना मिळणार आहे. या सर्व ऑफर्ससाठी कंपनीच्या अटी व शर्ती लागू राहतील.
'हर घर किसना'चा संकल्प; महाराष्ट्रातील विस्ताराला नवी दिशा
उद्घाटनप्रसंगी हरि कृष्णा ग्रुपचे संस्थापक घनश्याम ढोलकिया म्हणाले की, महाराष्ट्र हे किसनासाठी नेहमीच महत्त्वाचे बाजारपेठीय क्षेत्र राहिले आहे. यवतमाळमधील नवीन एक्सक्लुझिव्ह शोरूम हा आमच्या विस्तार प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. सणासुदीच्या काळात या विस्तारामुळे 'हर घर किसना' ही संकल्पना अधिक बळकट होईल. प्रत्येक भारतीय घरापर्यंत हिऱ्यांचे दागिने पोहोचवणे आणि ग्राहकांच्या खास क्षणांना अधिक संस्मरणीय बनवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.
परंपरेला आधुनिकतेची जोड
किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग शाह म्हणाले, "यवतमाळमध्ये सण, कौटुंबिक सोहळे आणि परंपरांना विशेष महत्त्व आहे. या संस्कृतीत दागिन्यांचे स्थानही महत्त्वाचे आहे. आमच्या नव्या शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडी आणि आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत हिरे व सोन्याच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आकर्षक ऑफर्स आणि फेस्टिव्ह कलेक्शनमुळे हा शुभारंभ ग्राहकांसाठी अधिक खास ठरेल.
स्थानिक ग्राहकांशी नाते जोडण्याचा विश्वास
किसनाचे एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट भागीदार विजय बी. हेडा आणि कृष्णा हेडा यांनीही या नव्या शोरूमबद्दल आनंद व्यक्त केला. यवतमाळच्या ग्राहकांना उत्कृष्ट दागिन्यांचे विविध पर्याय आणि आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देत त्यांच्या सण-समारंभांचा भाग बनण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
केवळ दागिन्यांची चमक नव्हे, सामाजिक बांधिलकीही शोरूमच्या उद्घाटनानिमित्त किसनाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत विविध उपक्रमांचे आयोजन केले. गरजूंसाठी अन्नवाटप, 'स्वच्छ भारत अभियान'ला पाठबळ देणारी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर अशा उपक्रमांतून कंपनीने सामाजिक कल्याण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
व्यापारविस्तारासोबत सामाजिक बांधिलकीची जोड देत, यवतमाळमध्ये 'किसना'ने आपल्या नव्या दालनातून ग्राहकांशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हिरे-सोन्याच्या दागिन्यांची विविधता, शुभारंभाच्या आकर्षक ऑफर्स आणि सामाजिक उपक्रम यांमुळे या उद्घाटनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

