Sunday, 24 Jan, 10.17 am HW Marathi

HW मराठी
धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर 'त्या' फाईलमधील मजकुरात परस्पर बदल ?

मुंबई । मंत्रालयातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमधील मजकूर परस्परच बदलून फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्याने राज्य सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सरकारकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर या फाईलमध्ये असलेल्या मजकूरात परस्पर बदलण्यात करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या फाईलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरील भागात लाल पेनाने आणखी एक मजकूर लिहण्यात आला अजून त्यात 'संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी' असे लिहिण्यात आले होते. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top