Sunday, 24 Jan, 3.23 pm HW Marathi

HW मराठी
ओबीसींची जनगणना करा ! गोपीनाथ मुंडेंचा 'तो' व्हिडीओ ट्विट करत पंकजा मुंडेंची मागणी

मुंबई । आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे. ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य असल्याचे ट्विट करत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. एक ट्विट करून त्यांनी ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी २०१० साली लोकसभेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ देखील त्यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीसोबत पंकजा मुंडे यांनी 'आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे', अशी कॅप्शन लिहिली आहे.

येणारी २०२१ सालची जनगणना ही जातीनिहाय करण्यात यावी अशी मागणी पंकजा मुंडे केली आहे. दरम्यान, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आता पंकजा मुंडे थेट मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्या जागी पंकजा मुंडे सज्ज झाल्या आहेत का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top