Sunday, 24 Jan, 4.56 pm HW Marathi

HW मराठी
राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे, मराठा तरुणांच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात !

मुंबई | मराठा आरक्षणाला सर्वोच न्यायालयात मिळालेल्या स्थगिती मुळे विविध पदावर मराठा समाजातील नियुक्त झालेल्या मराठा समाजातील तरुणांना रुजू होता आलेले नाही. याच्या विरोधात मराठा समाजातील तरूण आझाद मैदानात गेल्या ६ दिवसापासून आंदोलन करत आहेत. आज (२४ जानेवारी) या तरुणांची भेट विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी घेतली. राज्य सरकरच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजावर ही परिस्थिती ओढवली असल्याच आरोप यावेळी प्रवीण दरेकर यांनी केला आहे. भाजप सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत असलेले आरक्षण दिले. मात्र, राज्य सरकरच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वोच न्यायालयात ते टिकू न शकल्याचा ठपका त्यांनी ठेवला. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन पेटले तर त्यासाठी राज्यसरकार जबाबदार असेल असा इशाराही यावेळी प्रवीण दरेकर यांनी दिला.

मराठा समाजातील मुलेही शेतकऱ्यांचीच मुले ! । प्रवीण दरेकर

गेल्या ५ दिवसापासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यांची साधी विचारपूसही राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. मात्र, त्याच आझाद मैदानात केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसहित महाविकास आघाडीचे नेते भेट देत आहेत. मात्र शेतकऱ्यांचीच मुले असणाऱ्या मराठा समाजातील तरुणांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top