Monday, 08 Mar, 11.46 am HW Marathi

मुंबई
राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी विधिमंडळातील ३६ जण कोरोनाबाधित

मुंबई | आज (८ मार्च) राज्याचा २०२१-२२ चा अर्थसंक्लप राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. आज दुपारी २ वाजता सभागृहात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात करतील. मात्र, त्यापूर्वीच विधिमंडळाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. मुंबईतील जे.जे. रुग्णालयाने विधिमंडळातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, ६ आणि ७ मार्चला विधिमंडळातील २,४७६ जणांचे नमुने तपासणीसाठी आले होते. यापैकी ३६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्प मांडतेवेळी राज्य सरकारकडून काय खबरदारी घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विवाह सोहळे आणि लोकलमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकल ट्रेनमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे केंद्रीय पथकाने म्हटले आहे. तीन सदस्यीय केंद्रीय पथकाने १ आणि २ मार्चला दौरा करून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी केंद्रीय पथकाने हे निष्कर्ष नोंदवले होते. राज्यातील आरोग्य यंत्रणाही सुस्तावल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केले आहे. आगामी काळात कोरोनाचा प्रसार करण्यासाठी चाचण्यांची संख्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय पथकाने राज्य सरकारला केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top