Saturday, 19 Jan, 3.40 am HW Marathi

HW मराठी
Republic Day | इतिहास भारतीय प्रजासत्ताक दिनाचा

भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणजेच २६ जानेवारीला गणराज्य दिन असेही संबोधले जाते. भारतीय संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ साली भारताचे संविधान स्वीकारले. २६ जानेवारी १९५० सालापासून भारतीय संविधान अंमलात आणण्यात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० साली लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रजासत्ताक दिनी भारतीय सैन्याचा संचलनासह भारतातील विविध संस्कृती चित्ररथाच्या माध्यमातून सादर केली जाते. भारतातील राज्ये आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठवितात.

प्रजासत्ताक दिनी भारताची राजधानी दिल्लीत राजपथ मार्गावरून एक मोठी परेड (संचलन) निघते. भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना, घोडदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे रणगाडे यांच्यासह संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. दिल्लीत होणार्‍या संचलनासह भारतातील सर्व राज्यांमध्येही एक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, या स्वतंत्र भारताला स्वत:चे संविधान नव्हते. २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. संविधानाचा मसुदा ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला.

तब्बल २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सदस्यांनी दोन हिंदी आणि इंग्रजी हस्तलिखित प्रतींवर २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षऱ्या केल्या. दोन दिवसानंतर हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top