Thursday, 05 Jul, 7.40 am HW Marathi

HW मराठी
शिवसेनेच्या डॉ. मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी

मुंबई | विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक होणार आहे. ११ जागांपैकी ५ जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर शिवसेना २, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादी एका जागेवर उमेदवार उभा करणार आहेत. काँग्रेसकडून शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा हे दोन उमेदवार निश्चित केले आहेत. तर तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील अर्ज भरण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेकडून अनिल परब आणि डॉ. मनीषा कायंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

डॉ. मनीषा कायंदे यांचा अल्प परिचय

डॉ. मनीषा कायंदे या शिवसेनेच्या प्रवक्त्या असून त्या प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्यामसुंदर कायंदे व सुशीला कायंदे यांच्या कन्या आहेत. परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. वटवाघूळाच्या प्रजनन ग्रंथीबाबत त्यांनी केलेल्या संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे. सुमारे ११ वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून काम केल. तर त्यांनी डिस्ट्रिक्ट प्लानिंग ऐंड डेव्हलपमेंट कमिटीच्या सदस्य होत्या.

महिला दक्षता समिती (मुंबई पोलीस)च्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केल आहे. काँग्रेस शासना विरोधात महिलांना आरक्षण, महागाई, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात त्यांनी आंदोलन केली. मुंबई रेल युजर्स consultative committee वर असताना महिला प्रवाशांसाठी बरीच कामे केली.Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top