Friday, 03 Jul, 3.39 pm HW Marathi

HW मराठी
टायगर अभी जिंदा है', वर ज्योतिरादित्य यांना दिग्विजय सिंह यांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली | शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मध्य प्रदेशातील राजकारण तापले आहे. इतकी वर्ष काँग्रेस सोबत असणारे ज्योतिरादित्य काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मौन सोडत माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना 'टायगर अभी जिंदा है' या शब्दात इशाराच दिला. त्यानंतर दिग्विजय सिंग यांनीही वाघाच्या शिकारीला जाण्याचा किस्सा सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांना उलट उत्तर दिले आहे.

दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत'जेव्हा शिकार करण्यावर बंदी नव्हती. तेव्हा मी आणि श्रीमंत माधवराव शिंदेजी वाघाची शिकार करायचो. इंदिरा गांधींनी वन्यजीव संरक्षण कायदा आणल्यानंतर मी आता फक्त वाघाचे फोटो काढत असतो,' असे म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top