Tuesday, 09 Mar, 9.06 am HW Marathi

HW मराठी
ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून ३१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

ठाणे | राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. ठाणे शहरातील काही भागातही करोना प्रसार झपाट्याने होत असून, रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ठाणे शहरातील काही भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले असून, ठाणे महापालिका प्रशासनाने या भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी काढले आहेत.

ठाणे महापालिका हद्दीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं उद्रेक झालेल्या भागांना हॉटस्पॉट घोषित केलं आहे. या हॉटस्पॉटमधील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १६ हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये आजपासून (९ मार्च) लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी तसे आदेश काढले असून, हा लॉकडाउन सुरूवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाउनप्रमाणेच कडक असणार आहे.

या भागांमध्ये असणार आहे लॉकडाऊन

१) आई नगर, कळवा

२) सूर्या नगर, विटावा

३) खरेगाव हेल्थ सेंटर

४) चेंदणी कोळीवाडा

५) श्रीनगर

६) हिरानंदानी इस्टेट

७) लोढा माजीवाडा

८) रुणवाल गार्डन सिटी, बालकुम

९) लोढा अमारा

१०) शिवाजी नगर

११) दोस्ती विहार

१२) हिरानंदानी मिडोज

१३) पाटील वाडी

१४) रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर

१५) रुणवाल नगर, कोलबाद

१६) रुस्तोमजी, वृंदावनवृंदावन

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: hwmarathi.in
Top