Sunday, 24 Jan, 11.18 am IndiaReal

होम
महाबळेश्वर शिवसेनेच्यावतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

महाबळेश्वर : येथील मा. बाळासाहेब ठाकरे चौक येथे महाबळेश्‍वर शिवसेनेच्यावतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

अर्बन बँक चेअरमन बंडू धोत्रे, संचालक सुनील यादव, नगरसेवक युसूफ शेख, महिला आघाडीच्या ज्येष्ठ लीला शिंदे, नगरसेवक, भाजप जिल्हा पदाधिकारी रवींद्र कुंभारदरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बंडूशेठ कुंभारदरे, डी. एम. बावळेकर, युसूफ शेख, रवींद्र कुंभारदरे, शिवसेना तालुका संघटक विजय नायडू, गोपाळ लालबेग यांनी स्व. बाळासाहेब यांच्या आठवणी व मनोगत व्यक्त केले. शहरप्रमुख राजाभाऊ गुजर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेलार, शहरप्रमुख, उपनगराध्यक्ष सुनील साळुंखे, नगरसेवक प्रवीण शिंदे, पाचगणीचे उपनगराध्यक्ष बापू बिरामणे, शिवसेना संघटक नाना कदम, गोविंद कदम, युवासेना शहराध्यक्ष आकाश साळुंखे, उपशहराध्यक्ष शुभम कुंभारदरे, उपशहर प्रमुख प्रशांत मोरे, अर्बन बँकेचे व्यवस्थापक वलगे, महिला तालुका संघटिका राजश्री भिसे, वनिता जाधव, मालुसरे ताई, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण जिमन, ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य, अनिल कात्रट, नितीन परदेशी, शंकर ढेबे, अशोक ढेबे, सचिन गुजर, संजय ओंबळे, राजेंद्र बोधले, राजेंद्र पंडित, दत्तात्रय बावळेकर, राजेंद्र साळवी, आकाश ढेबे, उस्मान खारकंडे, ताजू शेख, बाळासाहेब पांचाळ, संतोष साळुंखे, शहनवाझ खारकंडे, रवींद्र बर्गे, सागर शिंदे, नीलेश धनावडे, प्रथमेश कोळी, सूर्यकांत उतेकर, जितेश कुंभारदरे, बाळू ढेबे, चंद्रकांत पांचाळ, संदीप मोरे, कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: IndiaReal
Top