Friday, 03 Jul, 2.56 pm InShorts मराठी

होम
अखेर 'त्या' वक्तव्याबद्दल इंदुरीकर महाराजांना चढावी लागणार कोर्टाची पायरी

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना अखेर कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. 7 ऑगस्टला आपली बाजू मांडण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी हजर रहावं, असे आदेश संगमनेर न्यायालयायने दिले आहेत.

जामखेडच्या सभापतीपदासाठी रोहित पवार व राम शिंदे यांच्यात चुरस

संगमनेर न्यायालयात आज विशेष सुनावणी पार पडली. यामध्ये आपली योग्य ती बाजू मांडण्यासाठी इंदुरीकरांनी न्यायालयाच्या समोर यावं असं, संगमनेर न्यायालयाने म्हटलेलं आहे. तसंच इंदुरीकरांना न्यायालयाने समन्स देखील बजावलं आहे.

मुंबईकरांसाठी चांगली बातमी ; मुंबईच्या लोकल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये झाली वाढ

पुत्रप्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांना कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत. एकूणच या प्रकरणात आता इंदुरीकर महाराज चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

दुसरीकडे या सगळ्यानंतर आता इंदुरीकर महाराज समर्थक आक्रमक झाले आहेत. महाराजांवरील गुन्हा मागे घेतला गेला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आता इंदुरीकर महाराज समर्थकांकडून देण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: InShorts Marathi
Top