Friday, 03 Jul, 2.17 pm InShorts मराठी

होम
चिंताजनक : गोव्यात आमदारासह पूर्ण कुटुंब निघालं कोरोना पॉझिटिव्ह

गोव्यात भाजपाचे आमदार क्लाफास डायस यांच्यासह पूर्ण कुटुंब कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डायस हे मंगळवारी कोविड पाॅझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर आज गुरुवारी त्यांची पत्नी व दोन्ही मुले कोविड पाॅझिटिव्ह आढळून आली. गोव्यात आमदार व त्याचे कुटुंबीय कोविडग्रस्त आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

येत्या 48 तासांत महाराष्ट्रातील 'या' भागांनी मान्सूनच्या स्वागतासाठी तयार राहावे !

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आठ दिवसांपूर्वी दहा आमदार एकत्र भेटले होते. त्यात डायस हेही होते. पत्रकारांनी सावंत यांना याविषयी विचारले तेव्हा आम्ही एकत्र आलो तरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रियांका गांधी यांना उ.प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करा ; काँग्रेस नेत्यांची मागणी

दरम्यान गोव्यात कोविड रुग्ण संख्या तेराशेहून अधिक नोंद झाली आहे. बहुतेक जण आजारातून बरे झाले आहेत. चौघा व्यक्तींचा कोविड इस्पितळात मृत्यू झाला आहे. गोव्यात आज बुधवारपासून देशी पर्यटकांसाठी पर्यटन व्यवसाय नव्याने सुरू झाला. तीन महिन्यांनंतर हॉटेल्स खुली होऊ लागली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: InShorts Marathi
Top