Friday, 03 Jul, 1.37 pm InShorts मराठी

होम
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा धुमाकूळ सुरु

हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानुसारच, शुक्रवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ सुरु केला. पूर्व आणि पश्चिम उपनगरासह शहरात सुरु झालेल्या पावसाने दुपारपर्यंत जोर कायम ठेवल्याने कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना धडकी भरलीच.

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस , वाचा

मुंबईतल्या सखल भागात नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी साचल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. या प्रामुख्याने माटुंगा येथील गांधी मार्केट आणि दादर येथील हिंदमाता परिसराचा समावेश होता. तर उर्वरित ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी पावसाचा वेग आणि मारा कायम राहिल्याने मुंबईचा वेग नेहमीच्या तुलनेत कमी झाला होता.

पुढील 48 तासांमध्ये राज्यात 'या' ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत आहे. मुंबईकर कामासाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र त्यातही अडचणी वाढतच आहेत. जुन महिना ब-यापैकी कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. विशेषत: शुक्रवारसह शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसाने आपला मुक्काम ठोकण्यास सुरुवात केली. पहाटे पावसाचा जोर वाढू लागला. विशेषत: सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस दुपारचे १२ वाजले तरी धो धो कोसळतच होता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: InShorts Marathi
Top