Saturday, 23 Jan, 4.43 pm InShorts मराठी

होम
ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, त्यामुळे सरकारला जागं करण्यासाठी आंदोलन करू

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून नेहमी सरकारवर नेहमीच टीका केली जाते. यावेळी आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केलीय. पाटील म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारने नेहमीच वनवासी बांधवांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली आहे. या सरकारच्या धोरणामुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण राज्य सरकारने त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी कायमच दुर्लक्ष केले. असं पाटील म्हणाले.

पुढे हे ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, त्यामुळे अशा सरकारला जागं करण्यासाठी जनतेचे प्रश्न शोधून त्यावर आंदोलन उभारुन सरकारचं लक्ष वेधले पाहिजे, असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी चंद्रकांत पाटील शुक्रवारी भोसरी येथे आयोजित जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

राज्यातील आघाडी सरकारमुळे अनेक समस्या उदभवल्या आहेत. त्या समस्या शोधून आंदोलने उभी केली पाहिजेत. सध्या राज्याच्या वसतीगृहातील अवस्था अत्यंत दयनीय आहे. डी.बी.टी.च्या माध्यमातून वनवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे जमा केले जातात, त्यातही भोंगळ कारभार सुरू आहे. काहींनी खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून शासकीय नोकऱ्यांचा लाभ घेतला. पण सरकारला याच्याशी काहीही घेणेदेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना वनवासी समाजाच्या विकासासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने २५ हजार वनवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शहरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांची सर्व फीआमच्या सरकारने भरली. त्यासोबतच वनपट्टे वनवासी बांधवांना मिळवून दिले. त्यासाठीचा जो कायदा होता, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. या सर्व कामांची माहिती कार्यकर्त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

  • रेणू शर्माची तक्रार राजकीय दबावातून; राजकारणाची पोळी भाजण्यासाठी धनंजय मुंडेंवर आरोप
  • भाजपला राष्ट्रवादीचा पुन्हा धक्का? पक्षप्रवेसाठी माजी आमदाराची अजितदादांसोबत चर्चा
  • अण्णा सावध रहा, भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका!
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: InShorts Marathi
Top