Wednesday, 21 Apr, 1.21 pm InShorts मराठी

होम
ठाकरे सरकार उभारणार ३०० मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प

राज्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत जात आहे. यामुळे रुग्णांना उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाहीये, परराज्यातून ऑक्सिजन आणावा लागतोय. ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य सरकारने ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारने स्वतःचा ३०० मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. हा प्रकल्प कोरोनापश्चातही सरकारच्या उपयोगी पडू शकतो, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोरोनारुग्णांसाठी ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ठाणे, कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा काढण्याची वाट न बघता ठाणे, कोल्हापूरचा आधार घेऊन निर्णय करणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्प उभारण्यात व्यत्यय येऊ नये, दिरंगाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

  • शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात
  • मोठी बातमी : राज्यात लॉकडाऊन निश्चित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घोषणा करण्याची शक्यता
  • लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय! नरेंद्र मोदी
  • रेमेडेसिविर इंजेक्शन आम्ही सरकारलाच देणार होतो, भाजप हे खोटं बोलत आहे: डॉ. राजेंद्र शिंगणे
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: InShorts Marathi
Top