Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिजीत दिपकेबाबत आईने उघड केलं मोठं सत्य; म्हणाल्या, "तो"..

अभिजीत दिपकेबाबत आईने उघड केलं मोठं सत्य; म्हणाल्या, "तो"..

कॉकरोच जनता पार्टीने देशभरात मोठे आंदोलन पुकारले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात हे आंदोलन सुरू होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन झाले. मात्र, सुरूवातीला सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले.

पण जंतर मंतरवर विद्यार्थी आक्रमक भूमिका घेताना दिसले.

विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारलाही झुकावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत जंतर मंतर सोडणार नसल्याचे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले. शेवटी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. अभिजीत दिपके आणि त्याच्या पक्षाला मोठे यश आले. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही पण दुसऱ्या प्रयत्नात या आंदोलकांनी देश दणाणून सोडला. फक्त दिल्लीच नाही तर देशभरात विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले. यादरम्यानच आता अभिजीत दिपके याच्या आईने मोठा खुलासा केला.

अमेरिकेतून अभिजीत दिपके भारतात आला आणि त्याने या आंदोलनाला सुरूवात केली. अभिजीत दिपके याच्या आईने नुकताच मोठी माहिती दिली. अभिजीत दिपके याच्या आईने म्हटले की, आता त्याला वेळ नाही, तो आजारी आहे. आंदोलनापासून तो जास्त बोलत नव्हता, तो म्हणत होता खूप जास्त मम्मी बोला बोलू नको. इमोशनल करू नको. तो म्हणायचा मला सर्वांचा पाठिंबा आहे.

तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, देशातले सगळे मला पाठिंबा देत आहेत. तो 6 जूनला आला होता, तेव्हा मी त्याला म्हटलं होतं आम्हाला कसतरी वाटतंय, तू आता जाऊ नको इथेच रहा. नाही मम्मी आता मी देशासाठी राहील माझा विचार कमी करा. मी त्याला म्हटलं तू माझा आहे तर तो म्हटला तुझा आता कमी ठेव आणि देशाचा ठेव.

एवढे विद्यार्थी जंतन मंतरवर आहेत. त्यांच्यासाठी मला काम करायचे आता तू समजून घे मी देशासाठीच काम करणार. मला त्यावेळेस थोडे वेगळे वाटलं, आता हा वेळ आपल्याला कमी देईल. एकुलता एक मुलगा त्यामुळे आपल्याकडे लक्ष राहणार नाही म्हणून चिंता वाटली. बरं वाटलं मात्र असे वाटले की मला हा वेळ आता कमी देणार.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Inside Marathi