Dailyhunt
दिव्यांका त्रिपाठीचा वेस्टर्न स्टाईल Baby Shower, सिनेविश्वातील कलाकारांची खास हजेरी, नवऱ्याचा जबरदस्त डान्स आणि.

दिव्यांका त्रिपाठीचा वेस्टर्न स्टाईल Baby Shower, सिनेविश्वातील कलाकारांची खास हजेरी, नवऱ्याचा जबरदस्त डान्स आणि.

ItsMajja Marathi 1 week ago

Divyanka Tripathi Baby Shower : टेलिव्हिजनची 'ईशी मां' म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी दहिया लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या डोहाळ जेवणाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.

अखेर दिव्यांकाच्या डोहाळ जेवणाचे खास फोटो समोर आले आहेत. ज्याचे फोटो तिच्या सिनेविश्वातील मित्रांनीही शेअर केले आहेत. या बेबी शॉवरमध्ये दिव्यांका खूपच क्यूट दिसत होती. तसेच या बेबी शॉवर पार्टीला टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. दिव्यांकाने तिच्या बेबी शॉवरमध्ये पांढऱ्या रंगाचा फ्लोय गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. या गाउनसह, अभिनेत्रीने तिचे केस अर्धे पिन केले आणि केस खाली मऊ कर्लमध्ये ठेवले. तर, दागिने म्हणून तिने ऑक्सिडाइज इअररिंग्जला पसंती दर्शविली. लाल रंगाच्या लिपस्टिकमध्ये अभिनेत्री खूपच गोंडस दिसत होती. आणि मॅटर्निटी ग्लोही तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.

या बेबी शॉवर फंक्शनमध्ये अनेक खेळही खेळले गेले. त्यातील काही व्हिडीओ दिव्यांकाच्या मित्रांनी शेअर केले आहेत. यातील एका खेळात नवऱ्यांचे हात बांधले जातात आणि बायकांना चेंडू मागे टाकावा लागला. हा गेम धीरज धूपर आणि विनी अरोरा धूपर यांनी जिंकला होता, या दोघांनीही त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय टू बी फादर म्हणजेच विवेक दहियानेही या फंक्शनमध्ये धमाकेदार डान्स केला. तर दिव्यांकाही तिथे डान्स करताना दिसली. या बेबी शॉवर फंक्शनला दिव्यांकाच्या टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये त्याच्या सर्वात लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बतें' ची संपूर्ण स्टार कास्ट देखील सहभागी झाली होती. या सर्वांनी डान्स करत कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमात शिरीन मिर्झा, नीना कुलकर्णी, दिव्यांकाची ऑनस्क्रीन मुलगी रुहानिका धवन हिनेही हजेरी लावली होती. याशिवाय श्रद्धा आर्या, एकता कपूर, संदीप सिकंद अशा अनेक इंडस्ट्रीतील नावांचा समावेश होता.

गौरव मोरेने गुपचूप केलं लग्न, ऋतुजा बागवेने दाखवली बायको, फोटो तुफान व्हायरल

दिव्यांका आणि विवेक लग्नाच्या १० वर्षानंतर आई-वडील होणार आहेत. दोघांनी जुलै २०१६ मध्ये भोपाळमध्ये लग्न केले. दोघेही 'ये है मोहब्बतें'च्या सेटवर भेटले होते. येथूनच त्यांचे प्रेम फुलले आणि दोघांनी लग्न केले. आता दोघेही लवकरच आई-वडील होणार आहेत आणि यासाठी दोघेही खूप उत्सुक आहेत. दोघे जुळ्या मुलांचे पालक होणार असल्याचीही बातमी आहे. या दोघांनी अनेक महिने पालक होणार असल्याची ही बातमी लपवून ठेवली होती. काही दिवसांपूर्वीच ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करण्यात आली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ItsMajja Marathi