Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, "मराठी असूनही."

हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, "मराठी असूनही."

ItsMajja Marathi 1 month ago

Ankita lokhande vicky jain abu dhabi vacation : अंकिता लोखंडे सध्या पती विकी जैनसोबत अबू धामीला गेली असून तिथले अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिताने तिच्या पतीसोबतचे सुंदर क्षण टिपले आहेत.

मात्र हिजाब परिधान केल्यामुळे ती युजर्सच्या निशाण्यावर आली असून मशिदीत गेल्यामुळेही यूजर्स अभिनेत्रीवर टीका करत आहेत. अलीकडेच, अंकिता जेव्हा गायींची सेवा करताना, त्यांच्यावर प्रेम करताना आणि त्यांना चारा घालताना दिसली तेव्हा लोकांनी तिची खूप प्रशंसा केली होती, पण आता हिजाब घालून आणि मशिदीत फोटो काढल्यामुळे तिच्या धार्मिक श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अबू धाबीच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, "माझ्या कॅमेरासोबत अबू धाबीबद्दल मला थोडेसे प्रेम होते. एक्सप्लोर करणे, हसणे आणि आठवणी तयार करणे. अंकिता आणि विकीने वंडर वुमन ते वॉर्नर ब्रदर्स फन झोन सारखी ठिकाणे शोधली आणि बरीच छायाचित्रे क्लिक केली".

'द महाराष्ट्र फाईल्स' वादाच्या भोवऱ्यात; सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री, तांत्रिक बिघाडामुळे चित्रपटाची तारीख पुढे

पण जेव्हा अंकिता लोखंडेने जीन्स-टॉपवर हिजाब परिधान केला आणि मशिदीत जाऊन विकी जैनसोबत फोटो काढले तेव्हा काही वापरकर्त्यांनी अभिनेत्रीला फटकारले. एकाने लिहिले की, "हिंदू नेहमीच धर्मनिरपेक्ष असल्याबद्दल बोलतात, पण मुस्लिम असे कधीच करत नाहीत. आणि तू मराठी मुलगी आहेस मग हिजाब का घातलास?". एकाने "तुम्ही मुस्लिम आहात का?". अंकिताने हिजाब न घालता मशिदीत क्लिक केलेला फोटो पाहायला मिळाला, तरीही काही यूजर्सनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. पण चाहत्यांना अंकिताची स्टाईल खूप आवडली आणि ती हिजाबमध्ये खूप सुंदर दिसते असेही सांगितले.

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, 'घबाडकुंड' चित्रपटातील लूकची चर्चा

अंकिता लोखंडेने हिजाब परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२५ मध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती हिजाब परिधान करून विमानतळावर 'अदाब' म्हणताना दिसली होती. त्यानंतर यूजर्स प्रश्न उपस्थित करू लागले की अंकिताने धर्म बदलला आहे का? तिने इस्लाम स्वीकारला आहे का? त्याचवेळी अंकिताने नुकताच रमजानचा सणही साजरा केला होता. मार्च २०२६ मध्ये, तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सलवार-सूट घातलेला आणि अदाब सादर करताना एक व्हिडीओ शेअर केला. सोबत लिहिले होते, "रमजान संयम, शांती आणि करुणेची आठवण करून देतो. जगभरातील रोजा पाळणाऱ्या प्रत्येकाला, या महिन्यात तुमच्या इच्छा पूर्ण होवोत. भारताकडून प्रार्थना आणि प्रेम".

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ItsMajja Marathi