Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लग्नाच्या चार महिन्यांनी सूरज चव्हाण होणार बाबा?, पत्नीचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

लग्नाच्या चार महिन्यांनी सूरज चव्हाण होणार बाबा?, पत्नीचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

ItsMajja Marathi 2 months ago

Suraj Chavan Wife Pregnant : 'बिग बॉस मराठी' सिझन ५ मुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण घराघरांत पोहोचला. बिग बॉस मराठी सिझन ५ च्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने नाव कोरले. सोशल मीडियावर सूरज बऱ्यापैकी सक्रिय असलेला पाहायला मिळतो.

नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. काही महिन्यांपूर्वी सूरज त्याच्या लग्नामुळे बराच चर्चेत आलेला पाहायला मिळाला. सूरजने त्याच्या मामाच्या मुलीशी लग्नगाठ बांधली. अगदी धुमधडाक्यात सूरजचा लग्नसोहळा पार पडला. सूरजच्या लग्नाला पाहुणे मंडळींसह अनेक चाहतेही उपस्थित होते. यानंतर आता सूरज पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. लग्नाच्या चार महिन्यांनी सूरजने आनंदाची बातमी दिली आहे की काय असं वाटतंय. सूरजच्या पत्नीच्या इंस्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

लगाच्या चार महिन्यांनी सूरज चव्हाण बाबा होणार आहे असं वाटत आहे. कारण सूरजच्या पत्नीच्या नावे असलेल्या एका अकाउंटवर सूरजची पत्नी संजनाचे बेबी बंप फ्लोन्ट करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे सूरज बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अदयाप सूरज वा संजना यांनी त्यांच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरुन याबाबतचा कोणताही उलगडा केला नाही.. मात्र बेबी बंप फ्लोन्ट करताना संजनाचे फोटो पाहून नेमकं सत्य काय याची उत्सुकता लागून राहिली आहे. इतकंच नाहीतर हे फोटो AI जनरेटेड असल्याचं दिसत आहे.

वयाच्या ४४ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, साधेपणाने पार पाडला विवाहसोहळा, पतीही आहे कलाविश्वात सक्रिय

यापूर्वी सूरज चव्हाणची बायको संजनानं गुढीपाडव्याच्या निमित्तानं खास फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमधील एक फोटो तिनं पोस्ट केला होता. त्यामागे एक ऑडिओ ऐकू येत होता… त्यात "अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की, वाटतं आयुष्य हलकं झालं. आता फक्त तुझी वाट बघतेय. तुझ्या त्या पहिल्या श्वासासाठी, आणि त्या छोट्याशा हसण्यासाठी, माझं संपूर्ण जग तुझ्यात बसलेलं आहे…". हा ऑडिओ ऐकूनही सूरज बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ItsMajja Marathi