Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरच होणार आई, चाहत्यांना दिली GOOD NEWS; 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरच होणार आई, चाहत्यांना दिली GOOD NEWS; 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

ItsMajja Marathi 3 weeks ago

Sambhavna seth is pregnant : भोजपुरी आणि टीव्ही अभिनेत्री ‘बिग बॉस’ फेम संभावना सेठने अखेर गुडन्यूज दिली आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर अखेर तिने आई होण्याची आनंदाची बातमी दिली आहे.

संभावना सेठने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की तिच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. संभावना सेठने सोशल मीडियावर तिच्या पाळीव कुत्र्यासोबत बाळाच्या सॉक्सचे छायाचित्र आणि अल्ट्रासाऊंड रिपोर्टची झलक दाखवली आहे. पती अविनाश द्विवेदीसोबत शेअर केलेल्या या पोस्टमध्ये भावना सेठने लिहिले आहे की, “आम्ही गरोदर आहोत. आमची सर्वात सुंदर कथा आता प्रेम, आशा आणि सरोगसीद्वारे सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहे. उलटी गिनती सुरू झाली आहे”.

संभावना यांच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु होत आहे. लाफ्टर क्वीन भारती सिंगने या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. आम्रपाली दुबे, दीपिका सिंग, माही विज, फ्लोरा सैनी, साकिब सलीम यांसारख्या इंडस्ट्रीतील अनेक मित्रांनी तिचे या गुड न्यूजबद्दल अभिनंदन केले आहे. २०२४ च्या शेवटी, भावनाने IVF च्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली होती. दुर्दैवाने, तिला तीन महिन्यांनंतर गर्भपात झाला. यानंतर तिने व्हिडिओ शेअर करत गर्भपातासाठी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले. स्कॅनच्या १५ दिवस अगोदरच मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले होते, ज्याबद्दल त्यांना माहिती नव्हती.

आणखी वाचा – "फोन वाजतो तिकडे तुमचं लक्ष का?", आस्ताद काळेच्या त्या व्हिडीओवर अभिनेते स्पष्टच बोलले, म्हणाले, "प्रेक्षक तुम्हाला…"

तिच्या YouTube व्हिडीओमध्ये, संभावनाने तिच्या गर्भपाताची दुःखद कहाणी सांगितली होती. तीन महिन्यांच्या गर्भधारणेनंतर तिचा गर्भपात झाल्याचे तिने सांगितले होते. या गर्भपातापूर्वी, संभावनाने देबिना बॅनर्जीच्या पॉडकास्टवर सांगितले होते की ती लवकरच चांगली बातमी शेअर करू शकते. ते म्हणाले होते की, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आता दूर झाल्या असून लवकरच चांगली बातमी देतील अशी शक्यता आहे. तेव्हापासून संभावना लवकरच चांगली बातमी देईल अशी अपेक्षा होती. यानंतर पती अविनाशने एक व्हिडीओ शेअर केला आणि कुटुंब वाढवण्याचा त्यांचा आणखी एक प्रयत्न उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले.

आणखी वाचा – 'चंद्रकांता' फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

संभावना यांचे पती अविनाश यांनी सांगितले की, त्यांची पत्नी तीन महिन्यांची गरोदर असून सर्व काही ठीक चालले आहे. अविनाश म्हणाला होता की तो 18 डिसेंबरलाच त्याच्या सर्व चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर करणार आहे, पण दुर्दैवाने त्याला सगळ्यांना ही वाईट बातमी द्यावी लागली आहे. व्हिडीओमध्ये अविनाशसोबत संभावनाही बसली असून ती खूप उदास आणि भावूक दिसत होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ItsMajja Marathi