Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वयाच्या ४४ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, साधेपणाने पार पाडला विवाहसोहळा, पतीही आहे कलाविश्वात सक्रिय

वयाच्या ४४ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, साधेपणाने पार पाडला विवाहसोहळा, पतीही आहे कलाविश्वात सक्रिय

ItsMajja Marathi 2 months ago

Nandita Patkar Second Marriage photo : सध्या मराठी सिनेविश्वातून कलाकार मंडळी आनंदाची बातमी देत आहेत. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अपूर्वा गोरे आणि अंशुमान जोशी ही कलाकार जोडी थाटामाटात लग्नबंधनात अडकली.

तर गौरव मोरेने प्रियांका कारेकरसह गुपचूप लग्न केलं. थेट त्याच्या नव्या घराच्या गृह्प्रवेशावेळी त्याचं लग्न झालं असल्याची बातमी समोर आली. यानंतर आता सिनेविश्वातून आणखी एका अभिनेत्रींच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नंदिता पाटकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी नंदिताने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. अत्यंत साधेपणाने नंदिताने लग्न केले आहे.

नंदितानं पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर यांच्याशी तिने लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नंअनेक कलाकारांनी शुभेच्छा देत दोघांचे फोटो पोस्ट केले आहेत. नंदिता आणि विपुल यांच्या लग्नाच्या या फोटोंवर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने अचानक घेतलेला हा लग्नाचा निर्णय अनेकांना सुखद धक्का देणारा ठरला आहे.

'पै पैशाची गोष्ट' आणि 'उध्वस्त धर्मशाळा' सारख्या दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकरने आपली ओळख निर्माण केली. विपुल यांच्या 'ते' या समलैंगिकतेवर आधारित पहिल्या एकांकिकेला राज्यस्तरावर द्वितीय पारितोषिक मिळालं होतं. तर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटानं नंदिताला एक विशेष ओळख मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं आणि त्यांना फिल्मफेअर मराठी पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं. त्यानंतर नंदिताने काही मागं वळून पाहिलं नाही. 'खारी बिस्किट', 'बाबा', 'लालबागची राणी' आणि 'पाणी' या चित्रपटांमधून नंदिताने अभिनयाची छाप उमटवली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ItsMajja Marathi