Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. २ ते ६ जून २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी २५ जागा उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशिक्षण शुल्क दि. २८ मे २०२६ पर्यंत नोंदणी करणाऱ्यांसाठी ४००० रुपये असून त्यानंतर ४५०० रुपये आकारले जाणार आहेत. प्रशिक्षणाचे ठिकाण मध्यवर्ती परिसर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे राहणार आहे.

प्रशिक्षणामध्ये आंब्याचा गर तयार करणे, आंब्यापासून सरबत (आरटीएस), सिरप व स्क्वॅश तयार करणे, आंबा पावडर, आंबा पोळी, कैरीपासून आमचूर व पन्हे तयार करणे, आंब्याचा जॅम, मुरंबा तसेच लोणचे तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे.

तसेच आंबा प्रक्रिया व्यवसाय कसा सुरू करावा, अन्न सुरक्षा व मानके कायद्याची माहिती, प्रक्रिया उद्योगाची नोंदणी, आवश्यक मशिनरी व देखभाल, पॅकेजिंग व मार्केटिंग, शासनाच्या कर्ज योजना व अनुदान, उद्योगातील अडचणी व त्यावरील उपाययोजना तसेच उद्योग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

इच्छुकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर शुल्क जमा करून त्याची स्क्रीनशॉट कार्यालय प्रतिनिधी राहुल घुगे (मो. ९४२१४३७६९८) यांच्याकडे पाठवावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी (०२४२६) २४३२५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्कॅगवे : व्हाईटपास रेल्वेचा चित्तथरारक प्रवास

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari