Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२६' साठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

'अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२६' साठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

नांदेड : येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने 'अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२६' (वर्ष तिसरे) साठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रातील नवोदित आणि गुणवंत लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

या पुरस्कारांतर्गत मुख्य पारितोषिक म्हणून ५,००० रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित चार वाङ्मयप्रकारांतील निवडक साहित्यकृतींना विशेष सन्मान म्हणून प्रत्येकी २,००० रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित पहिल्या आवृत्तीच्या साहित्यकृतींचा विचार केला जाणार आहे. यामध्ये कवितासंग्रह, कादंबरी, कथा/ललित, चरित्र/आत्मचरित्र तसेच वैचारिक/समिक्षा या प्रकारांचा समावेश आहे.

साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख १० मे २०२६ असून, इच्छुक साहित्यिकांनी आपली पुस्तके संयोजक, अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार, द्वारा डॉ. माधव जाधव, ६, कुळवाडी, साईनगरी, तरोडा पो.ऑ. काबरानगर जवळ, वाडी (बु.), नांदेड - ४३१६०५ येथे पाठवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९४२३४३९९९१, ९६५७४७८८४४

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा

मराठी विचारांची डिजिटल नगरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari