Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एकता फाउंडेशनचे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार जाहीर

एकता फाउंडेशनचे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार जाहीर

पाडळीतील संमेलनात होणार वितरण

शिरूर कासार : मराठवाड्यासह राज्यभरातील ग्रामीण भागाचा सामाजिक परिपोष समृद्ध व्हावा या उद्देशाने साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाज व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कसलाही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन कार्यरत असलेल्या एकता फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनांच्या माध्यमातून उत्कृष्ट साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात.

सन २०२५ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यंदा शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथे होणाऱ्या ८ व्या एकता मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती एकता कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी दिली.

यंदाचे पुरस्कार असे:

कै. विश्वनाथ यादव कराड (गुरुजी) राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार पुणे येथील शरद अत्रे यांच्या 'जगावेगळी' आणि अहिल्यानगर येथील गोकुळ गायकवाड यांच्या 'ताटातूट' या कथासंग्रहांना विभागून जाहीर झाला आहे.

कै. विश्वनाथ शंकरराव पवार (से.नि. पोस्टमास्तर) राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार बुलढाणा येथील डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या 'बारूद' या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.

स्वा. सै. गणपतराव बडे सार्वजनिक वाचनालय, लोणी (ता. शिरूर कासार, जि. बीड) राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार पिंपरी-चिंचवड येथील आशा नेगी हिरेमठ यांच्या 'ब्युटी ऑफ लाईफ' या कादंबरीला जाहीर झाला आहे.

कै. काशिनाथ आश्रुबा शिंदे (सर) राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार कोल्हापूर येथील डॉ. श्रीकांत पाटील यांच्या 'रंगतदार नाट्यछटा' या पुस्तकाला जाहीर झाला आहे.

कै. वच्छलाबाई बाबासाहेब सानप (आदर्श माता) राज्यस्तरीय उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार गोवा येथील मुग्धा बोरकर यांच्या 'कोलाज' आणि अकोला येथील डॉ. मोहन खडसे यांच्या 'गुपित आनंदाचं' या पुस्तकांना विभागून जाहीर करण्यात आला आहे.

कै. परमेश्वर भागुजी कैतके (लाईनमन) राज्यस्तरीय उत्कृष्ट संशोधन-संपादन साहित्य पुरस्कार धाराशीव येथील डॉ. सौ. रेखा ढगे यांच्या 'सावित्रीच्या कविता' या साहित्यकृतीला जाहीर झाला आहे.

कै. लताबाई पुरुषोत्तम बारडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार परभणी येथील प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये यांच्या 'तुकाराम नीती' या पुस्तकाला जाहीर झाल्याची माहिती एकता पुरस्कार निवड समितीने दिली आहे.

दरम्यान, कथाकार प्रा. डॉ. भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखालील पुस्तक परीक्षण समितीने या पुरस्कारांसाठी साहित्यकृतींची निवड केली. या समितीत एकताचे प्रदेश संघटक देवीदास शिंदे, सातारा जिल्हाध्यक्षा श्रीमती रंजना सानप, युवक प्रदेश निमंत्रक इम्रान शेख, नांदेड जिल्हाध्यक्षा ॲड. सुचिता गिते, द. मा. माने (शिरूर ताजबंद), पाथर्डी तालुकाध्यक्ष राजेंद्र उदारे, लातूर प्रतिनिधी जी. जी. कांबळे, शेवगाव तालुकाध्यक्ष प्रदीप बोडखे, तालुका सल्लागार ॲड. प्रताप वाघुंबरे, पाटोदा तालुका सहसचिव बाळासाहेब नागरगोजे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश वाकळे, परभणी जिल्हाध्यक्ष पु. ना. बारडकर, मराठवाडा विभागीय महिला आघाडी प्रमुख प्रा. डॉ. संगीता घुगे आणि विभागीय सचिव अंबादास केदार यांचा समावेश होता.

Share this:


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Subscribe

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari