कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कविता संग्रहासाठी 'कदंब पुरस्कार' देण्यात येणार आहे. यासाठी जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कविता संग्रहांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
इच्छुक कवींनी आपल्या कविता संग्रहाच्या दोन प्रती २ जुन २०२६ पर्यंत महाराष्ट्र ग्रंथ भांडारकडे पाठवाव्यात, असे आवाहन संयोजक मंजुश्री गोखले यांनी केले आहे.
पुरस्कार वितरण सोहळा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता :
महाराष्ट्र ग्रंथ भांडार, महाद्वार रोड, कोल्हापूर - ४१६००४.
संपर्क - +91 88053 55200
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेकडून विविध पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

