कराड - प्रती वर्षाप्रमाणे ह्या वर्षीही मातुश्री स्व. सौ. वत्सलामाई बोबडे व पिताश्री स्व. वामनराव बोबडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार योजनेचे आयोजन शब्दशिल्प वाड्.मय प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
२०२६ च्या या योजनेसाठी कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, काव्यसंग्रह, ललित, समीक्षा,संपादन अशा वैशिष्ट्यदर्शी वाड्मय प्रकारातील साहित्य मागविण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येक वाड्मय प्रकारासाठी आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ ह्या कालावधीत प्रकाशित झालेले ग्रंथ ग्राह्य धरण्यात येणार आहे. तरी ३० जून २०२६ पर्यंत ग्रंथाच्या २ प्रती, अल्पपरिचयासह पाठवावेत असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
पुरस्कारसाठी ग्रंथ पाठवण्याचा पत्ताः
प्रा. (डॉ.) सुहासकुमार बोबडे,
समन्वयक शब्दशिल्प वाड्मय प्रतिष्ठान, कराड
"शब्दशिल्प" अ/२७,रुक्मिणी गार्डन भाग २
कराड ४१५११० जि. सातारा
संपर्क क्र.९४०३३४५३५१
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
मराठी विचारांची डिजिटल नगरी

