वर्धा : महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्यकृतींना प्रोत्साहन आणि सन्मान देण्यासाठी मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, वैचारिक साहित्य आणि उत्कृष्ट लेखिका अशा पाच विभागांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांनी आपली पुस्तके पाठवावीत, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी केले आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप सहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कारांचे पाच विभाग असे -
१. मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार
२. मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार
३. मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार
४. मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार
५. मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखिका पुरस्कार
या पुरस्कारांसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.१ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या केवळ प्रथम आवृत्तीच्या तीन प्रती पाठविणे आवश्यक आहे. इच्छुक साहित्यिकांनी आपल्या पुस्तकांच्या तीन प्रती १५ फेब्रुवारी २०२७ पर्यंत प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, अध्यक्ष, मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान, शाहू लेआऊट, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाजवळ, वर्धा - ४४२००१ या पत्त्यावर पाठवाव्यात.
पुरस्कारांची घोषणा १५ मार्च २०२७ रोजी केली जाईल. त्यानंतर २४ एप्रिल २०२७ रोजी मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवून सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे (९८५०३०९६६५), सचिव हेमलता नारायणे (९०११८७८४८९), पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य श्रीकांत पेटकर, कल्याण (९७६९२१३९१३), किशोर पेटकर, नागपूर (८८०६२४७६८६), प्रा. डॉ. संदीप भेले, बदलापूर (९८८१४२२४५३) आणि सूर्यकांत पाटील, वरोरा (९४२२१९१५२४) यांनी केले आहे.

