शिवांजली स्वामी यांनी दिली आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून, दरवर्षी विविध साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींचा गौरव केला जातो.
यंदा कादंबरी, ललितलेख संग्रह आणि बालकथासंग्रह/बालकादंबरी या तीन साहित्यप्रकारांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींचा विचार पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे असून, पुरस्कार वितरण समारंभ ऑक्टोबर २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी इच्छुक साहित्यिकांनी आपल्या कादंबरी, ललितलेख संग्रह, बालकथासंग्रह अथवा बालकादंबरीच्या प्रत्येकी दोन प्रती, स्वतःचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि अल्प परिचय पाठवावे. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ अशी आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता -
यु. बी. मठपती
ब्लॉक क्र. १४, कनिष्क नगर,
जुळे सोलापूर, सोलापूर - ४१३००४.
मोबाईल : ९८८१२१६६४८

