Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सरहद संस्थेच्यावतीने ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार

सरहद संस्थेच्यावतीने ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार

दिल्ली: महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 250 व्या जयंती वर्षानिमित्त विशेष "महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार" भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य माधवराव शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सरहद संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.

या पुरस्कारासाठीची निवड डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकमताने केली असून, समितीत महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे संजय सोनवणी आणि प्रकाश खाडे यांचा समावेश होता. समितीने हा निर्णय घेताना शिंदे घराण्याने होळकर घराण्याच्या खांद्याला खांदा लावून मराठेशाहीचा उत्तरेत विस्तार करण्यात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीचा सन्मान यांचा विचार केला आहे. मराठा इतिहासात शिंदे आणि होळकर ही दोन घराणी अनेक निर्णायक प्रसंगी परस्पर सहकार्य, सामूहिक युद्धकौशल्य आणि राष्ट्रदृष्टिकोनाची प्रतीके होती.

इतिहासात राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांनी दिल्लीतील मराठा प्रभाव दृढ करण्यासाठी एकत्रित भूमिका बजावली; पुढे महादजी शिंदे यांनी मराठा मुत्सद्देगिरीला सर्वोच्च शिखरावर नेले; तर पानिपतपूर्व आणि पानिपतनंतरच्या अनेक लढायांत शिंदे-होळकर सहकार्याचे अनेक संदर्भ आढळतात. काही बखरींमुळे आणि नंतरच्या किरकोळ संघर्षांमुळे निर्माण झालेल्या गैरसमजांपलीकडे जाऊन या दोन घराण्यांच्या व्यापक ऐतिहासिक योगदानाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.

छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंती वर्षात दिल्लीत सरहद संस्था आयोजित, महाराष्ट्र सदन - दिल्ली आणि मराठी भाषा विभाग - महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी शनिवार 11 एप्रिल 2026 रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्वातंत्र्यनिष्ठ परंपरेचा आणि शिंदे घराण्याच्या ऐतिहासिक राष्ट्रकार्यातील योगदानाचा सन्मान एकाच व्यासपीठावर होणे, हा राष्ट्रीय ऐक्याचा महत्त्वपूर्ण क्षण ठरणार आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा

मराठी विचारांची डिजिटल नगरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari