Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तंजावरच्या मराठा इतिहासाचा पाठ्यपुस्तकात समावेश करावा Contribution of Tanjore Maratha Kings Book Publication

तंजावरच्या मराठा इतिहासाचा पाठ्यपुस्तकात समावेश करावा Contribution of Tanjore Maratha Kings Book Publication

सुचेता भिडे-चापेकर : 'तंजावर साम्राज्यातील मराठा राजांचे योगदान'चे प्रकाशन

पुणे : महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा,संस्कृती आणि स्वराज्याची परंपरा जपणाऱ्या तंजावरच्या मराठा साम्राज्याचा इतिहास इयत्ता सातवी-आठवीच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला पाहिजे,असे मत ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले.

तंजावरचे युवराज सरफोजी राजे भोसले लिखित Contribution of Tanjore Maratha Kings या इंग्रजी पुस्तकाचा प्रा. डॉ. मनोहर इंगळे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या 'तंजावर साम्राज्यातील मराठा राजांचे योगदान' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष श्रीमंत युवराज जयसिंह राजे भोसले,तंजावरचे युवराज प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले, प्रा.डॉ.मनोहर इंगळे आदी उपस्थित होते.

भिडे-चापेकर म्हणाल्या, तंजावरमधील मराठा राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या सीमाबाहेर मराठी भाषा,संस्कृती,कला आणि ज्ञानपरंपरेचा विकास केला. हा वैभवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातवी-आठवीच्या मराठी व इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्याचा समावेश होणे आवश्यक आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

युवराज प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले यांनी मोडी लिपीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली.यासंदर्भात आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा साम्राज्य आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे, सनदा आणि ऐतिहासिक संदर्भ मोडी लिपीमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Iye Marathichiye Nagari