Dailyhunt
8th Pay Commission मध्ये नव्या IAS अधिकाऱ्याची एंट्री, तुमचे वेतन व भत्ते वाढवण्याचे करणार काम; वाचा काय आहे नाव

8th Pay Commission मध्ये नव्या IAS अधिकाऱ्याची एंट्री, तुमचे वेतन व भत्ते वाढवण्याचे करणार काम; वाचा काय आहे नाव

Jagran Marathi 1 week ago

वी दिल्ली. 8th Pay Commission News: आठव्या वेतन आयोगात नवीन अधिकारी सामील झाले आहेत. आयोगातील अधिकाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. ही वाढती संख्या दर्शवते की, आठवा वेतन आयोग आपले काम लवकरात लवकर पूर्ण करून सरकारला आपला अहवाल सादर करण्यास उत्सुक आहे.

सध्या, आठवा वेतन आयोग विविध शहरांमध्ये बैठका घेत आहे. आतापर्यंत आयोगाने डेहराडून आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये विविध कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

या बैठकांदरम्यान आठव्या वेतन आयोगात समाविष्ट झालेले आयएएस अधिकारी ब्रिजेंद्र नवनीत आहेत. आठव्या वेतन आयोगात (8th Pay Commission) आयएएस ब्रिजेंद्र नवनीत यांची अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचा अर्थ, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यातही त्यांची भूमिका असेल.

8th Pay Commission News: आदेश जारी

कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयांतर्गत असलेल्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली. विभागाने प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे - "मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने, सध्या संवर्गात कार्यरत असलेले ब्रजेंद्र नवनीत, आयएएस IAS (TN:1999) यांची, वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागातील आठव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत अतिरिक्त सचिव पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ही नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून एकूण चार वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल, तोपर्यंत प्रभावी राहील."

ब्रजेंद्र नवनीत हे तामिळनाडू केडरचे 1999 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सुशासन, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय धोरणनिर्मिती या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व देदीप्यमान कामगिरी असलेले बहुक्षेत्रीय प्रशासक म्हणून ते सर्वत्र ओळखले जातात.

हे ही वाचा -8th Pay Commission News: फिटमेंट फॅक्टर 3.88 झाले, तर लेवल 1 ते 18 पर्यंत कोणाचा किती वाढेल पगार?वाचा संपूर्ण गणित

आयएएस ब्रजेंद्र नवनीत 8th Pay Commission मध्ये 4 वर्षांसाठी कार्यरत असतील.

नवनीता पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून चार वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर राहतील. ते सध्या तामिळनाडू सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.

तामिळनाडू केडरचे 1999 च्या तुकडीचे अधिकारी असलेले नवनीत यांना प्रशासन, वित्त आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रांचा दांडगा अनुभव आहे. त्यांची केंद्र सरकारमधील बदली ही राज्य प्रशासनाकडून एका महत्त्वाच्या धोरण-निर्धारण भूमिकेकडे झालेला एक महत्त्वपूर्ण बदल आहे.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून त्यांनी धोरण समन्वयात योगदान दिले. त्यांनी जागतिक व्यापार संघटनेत (WTO) भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी म्हणूनही काम पाहिले, जिथे त्यांनी जागतिक व्यापार वाटाघाटींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. आता ते आठव्या वेतन आयोगात (8th Pay Commission) अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहतील.

हे ही वाचा -Gratuity calculation: बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी की सीटीसी: कोणता आधारावर बनते तुमची ग्रॅच्युइटी? सोप्या शब्दांत घ्या समजून

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi