Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीची एन्ट्री; मनी लाँड्रिंग प्रकरणात घेणार ताब्यात!

Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीची एन्ट्री; मनी लाँड्रिंग प्रकरणात घेणार ताब्यात!

Jagran Marathi 1 month ago

नाशिक/पुणे : भोंदूगिरी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सक्रिय झाले आहे. माहितीनुसार, ईडी लवकरच न्यायालयात अर्ज दाखल करून अशोक खरात याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

या कारवाईमुळे प्रकरणाला मोठे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

ईडीने काही दिवसांपूर्वी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे येथे एकाच वेळी धाडसत्र राबवले होते. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची नोंद आणि मालमत्तेशी संबंधित पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तपासादरम्यान संशयास्पद व्यवहार आणि शेल कंपन्यांद्वारे निधी फिरवण्याचे प्राथमिक संकेत मिळाल्याचेही समोर येत आहे.

माहितीनुसार, अशोक खरात यांची एकूण संपत्ती हजारो कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर ईडीकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. काही मालमत्तांवर तात्पुरती जप्ती (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची कारवाई लवकरच होऊ शकते.

दरम्यान, ईडीकडून मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने परवानगी दिली, तर ईडी अशोक खरात यांची सखोल चौकशी करण्यासाठी कोठडीची मागणी करू शकते.

या प्रकरणात पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, ईडीच्या कारवाईमुळे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा -'..तेव्हा मी प्लेबॉय बनलो होतो', शेकडो मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा खुलासा, 'लव्ह ट्रॅप'मध्ये नवा ट्विस्ट

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi