नाशिक. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास करणाऱ्या SIT कडून आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून तपासातील मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुठे आणि कधी होणार परिषद?
• आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद
• ठिकाण: महाराष्ट्र पोलीस अकॅडमी
• SIT प्रमुख तेजस्वी सातपुते माध्यमांसमोर माहिती देणार
काय होणार खुलासे?
• अशोक खरातने महिलांचे कथित शोषण कशा पद्धतीने केले
• त्याच्या संपर्कात असलेल्या उच्चपदस्थ अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींची नावे
• आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि गैरव्यवहारांची माहिती
• आतापर्यंत SIT ने गोळा केलेले पुरावे
SIT वर प्रश्नचिन्ह
गेल्या काही दिवसांत या प्रकरणाच्या तपासावरून SIT वर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
• तपासाचा वेग मंद असल्याची टीका
• काही मोठी नावे समोर येत नसल्याचा आरोप
• राजकीय दबावाची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर SIT पहिल्यांदाच अधिकृतपणे माध्यमांसमोर येत असल्याने या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या पत्रकार परिषदेतून तपासाची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येऊ शकतात. पुढील कारवाईबाबत संकेत मिळू शकतात. या परिषदेनंतर अशोक खरात प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता संध्याकाळी 5 वाजताच्या या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.

