Dailyhunt
अशोक खरातला 8व्या गुन्ह्यात 12 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी; पोलिसांची 'ती' मागणी धुडकावली, आता 9व्या गुन्ह्यात घेणार ताबा!

अशोक खरातला 8व्या गुन्ह्यात 12 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी; पोलिसांची 'ती' मागणी धुडकावली, आता 9व्या गुन्ह्यात घेणार ताबा!

Jagran Marathi 1 week ago

नाशिक. Ashok Kharat News: अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांना मोठा धक्का बसला असून न्यायालयाने खरातला पोलीस कोठडी देण्यास नकार दिला आहे. आठव्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरातला न्यायालयाने 12 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

त्यामुळे पुढील काही दिवस खरातला कारागृहातच राहावे लागणार आहे.

या प्रकरणात पोलिसांनी खरातची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडीच सुनावली. यामुळे तपासासाठी आवश्यक असलेली चौकशी पोलीस कोठडीत करता येणार नसल्याने तपासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, खरातविरुद्ध दाखल गुन्ह्यांची संख्या वाढत असून, आता नवव्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या गुन्ह्यातील तपासासाठी खरातची कोठडी मिळवणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्या पुन्हा एकदा अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्या वेळी SIT कडून नवव्या गुन्ह्याच्या संदर्भात कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

अशोक खरात प्रकरणातील गुन्ह्यांची मालिका वाढत चालल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत असून, पुढील सुनावणी आणि न्यायालयीन निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi