Dailyhunt
बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार; आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात

बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार; आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात

Jagran Marathi 2 weeks ago

जेएनएन, बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल 19 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून लढत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील निवासस्थानी जाऊन अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचा आशीर्वाद घेतला. या पारंपरिक भेटीमुळे त्यांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी बालेकिल्ला मानला जातो. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, 1991 मध्ये अजित पवार हे सुरुवातीला खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली होती. आता त्याच धर्तीवर सुनेत्रा पवार यांनीही राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर पोटनिवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दरम्यान, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मोठी हालचाल सुरू असून प्रचारयंत्रणा सज्ज होत आहे. विविध पक्षांचे नेते बारामतीत दाखल होण्याची शक्यता असून आगामी काही दिवसांत सभा, दौरे आणि प्रचाराची रणधुमाळी वाढणार आहे.

या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणूक ही केवळ स्थानिक न राहता राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची लढत ठरणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुकींची चुरस वाढली; राहुरीत वंचितकडून अनिल जाधव यांना उमेदवारी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi