Dailyhunt
भोंदूगिरीचा पर्दाफाश! अशोक खरातला फक्त चारच मंत्र पाठ; SIT चौकशीत धक्कादायक खुलासा

भोंदूगिरीचा पर्दाफाश! अशोक खरातला फक्त चारच मंत्र पाठ; SIT चौकशीत धक्कादायक खुलासा

Jagran Marathi 1 week ago

जेएनएन, नाशिक: अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. स्वतःला धार्मिक गुरु आणि चमत्कार करणारा बाबा म्हणून सादर करणाऱ्या खरातचा खरा चेहरा आता उघड होत आहे. SIT चौकशीत अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे-खरातला केवळ चारच मंत्र पाठ असल्याचे उघड झाले आहे.

SIT अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत खरातला विविध धार्मिक विधी, पूजा आणि मंत्रांबाबत सखोल प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यावेळी तो अनेक प्रश्नांना उत्तरे देण्यात अपयशी ठरला. विशेष म्हणजे, तो वारंवार तेच चार मंत्र बोलत असल्याचे समोर आले, ज्यामुळे त्याचा भोंदूपणा उघड झाला.

तपासात असेही आढळले की, खरात लोकांना फसवण्यासाठी धार्मिक भीती आणि अंधश्रद्धेचा आधार घेत होता. आजार बरे करण्याचे, समस्या दूर करण्याचे आमिष दाखवत त्याने अनेकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात आधीच जमीन गैरव्यवहार, अवैध सावकारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, SIT आता आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत आहे. खरातच्या संपर्कात काही अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती असल्याचीही चर्चा असून, तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या खुलाशानंतर समाजात संतापाची लाट उसळली असून, अंधश्रद्धेविरोधात पुन्हा एकदा कडक कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून लवकरच आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने सुनावली 14 दिवसांची कोठडी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi