Dailyhunt
Budget Session 2026: आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार 15 विधेयक

Budget Session 2026: आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार 15 विधेयक

Jagran Marathi 1 month ago

जेएनएन, मुंबई: आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 15 विधेयक मांडली जाणार आहे.

यामध्ये विधानसभेत प्रलंबित विधेयक

(१) महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2025 (उद्योग, ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग)

(२) महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक, 2025 (गृह विभाग)

सभागृहाच्या पटलावरती ठेवण्यात येणारे अध्यादेश

१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, 2025 (नगरविकास विभाग)

२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, 2025 (ग्रामविकास विभाग)

३) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, 2026 (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

प्रस्तावित विधेयक

१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा)

विधेयक, २०२६ (सन २०२५ चा अध्यादेश क्रं. १३ याचे रूपांतरित विधेयक) (नगरविकास विभाग)

२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२६. (सन २०२५ चा अध्यादेश क्रं. १४ याचे रूपांतरित विधेयक) (ग्रामविकास विभाग)

३) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२६ (सन २०२६ चा अध्यादेश क्रं. १ याचे रूपांतरित विधेयक) (उच्च व तंत्र शिक्षण) (राज्य शासनाकडून इरादा पत्र देण्याचा दिनांक वाढविता यावा म्हणून कलम १०९ ची सुधारणा)

४) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन विधेयक, २०२६ (उच्च व तंत्र शिक्षण)

५) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०२६ (वित्त विभाग)

६) महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२६ (वित्त विभाग)

७) महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२६ (वित्त विभाग)

८) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६ (महसुल व वन विभाग)

९) महाराष्ट्र उद्दाहक, सरकते जिने व सरकरते मार्ग (सुधारणा), विधेयक, २०२६. (उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)

१०) महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०२६ (उच्च व तंत्रशिक्षण विभाग) असे आहेत.

हेही वाचा: Budget Session 2026: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थसंकल्पीय अधिवेशनात 15 विधेयके मांडण्यात येणार

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi