Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Chemist Strike: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, 12 लाखांहून अधिक मेडिकल दुकाने राहणार बंद; नेमक्या काय आहेत मागण्या?

Chemist Strike: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, 12 लाखांहून अधिक मेडिकल दुकाने राहणार बंद; नेमक्या काय आहेत मागण्या?

Jagran Marathi 1 week ago

मुंबई. देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट संघटनांनी ऑनलाइन औषध विक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. आज एकदिवसीय राष्ट्रव्यापी बंद पुकारण्यात आला असून, देशातील तब्बल 12 लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांना औषधे मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, ऑनलाइन औषध विक्री कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप औषध विक्रेते संघटनांकडून करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री, सवलतींच्या नावाखाली अनियमित व्यवहार आणि स्थानिक मेडिकल व्यवसायावर होणारा परिणाम या मुद्द्यांवरून संघटना नाराज आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

देशभरातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने या बंदला पाठिंबा दिल्याने अनेक राज्यांमध्ये मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात रुग्णांना औषधे मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी आवश्यक औषधांचा साठा आधीच करून ठेवावा, असे आवाहनही काही संघटनांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, आपत्कालीन सेवा आणि रुग्णालयांशी संलग्न काही मेडिकल दुकाने सुरू ठेवण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र सर्वसामान्य बाजारपेठांमधील बहुतांश मेडिकल दुकाने बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आंदोलनामुळे ऑनलाइन औषध विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला असून, केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण औषध व्यवसाय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -औषधांचा स्टॉक आजच घेऊन ठेवा! उद्या देशभरातील 12 लाखांहून अधिक मेडिकल दुकाने राहणार बंद?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Jagran Marathi